संपूर्ण वर्षभरासाठी फटाक्यांवर बंदी; उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने खळबळ!

Firecracker Ban | सध्या राज्यभरात नवरात्रीचा उत्साह असून आगामी काळात दसरा आणि दिवाळीचे सण येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा मुद्दा गांभीर्याने घेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक आदेश दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी :

राज्यातील सर्व उत्सवांमध्ये वर्षभर सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक रस्त्यांवर फटाके वाजवण्यास पूर्ण बंदी राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशातही हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घातली होती.

मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, द असोसिएशन ऑफ फायरवर्क्स ट्रेडर्सच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा सविस्तर आदेश दिला आहे.

Firecracker Ban | न्यायोलयाचे प्रमुख निर्देश:

– सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांवर फटाकेबंदी ही केवळ दिवाळीपुरती नसून संपूर्ण वर्षभर सर्व सण-उत्सवांमध्ये लागू असेल.
– महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्तमानपत्रे, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या बंदीबद्दल व्यापक जनजागृती करावी. यासाठी हवी तर सेलिब्रिटींची मदत घ्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
– पोलिसांनी वॉर्ड स्तरावर याविषयीच्या सूचना प्रसिद्ध करून कडक अंमलबजावणी करा

‘उत्सव साजरे करण्यास आमचा विरोध नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करून विषारी धूर आणि उच्च आवाजाच्या प्रदूषणात जगण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही,’ असे मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले.