पिंपरी चिंचवडमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी अवैध; नागरिकांना अ‍ॅप वापरण्यास बंदीचे आवाहन

पिंपरी चिंचवड, २७ ऑक्टोबर २०२६: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी रॅपिडो (Rapido) कंपनीकडे पुणे जिल्ह्यासाठी वैध बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर परवाना नसल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनी विनापरवाना पिंपरी चिंचवड शहरात बाईक टॅक्सी व्यवसाय सुरू ठेवल्याने नागरिकांना या अ‍ॅपचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, मे. रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो) यांनी ई-बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यात विनापरवाना सुरू केलेले बाईक टॅक्सी संचलन तात्काळ पूर्णपणे बंद करावे. विनापरवाना व्यवसाय आढळल्यास संबंधित कंपनीवर पोलीस विभागामार्फत गुन्हा दाखल करावा.तरीही रॅपिडोने अ‍ॅप सुरू ठेवल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन भोसरी (एमआयडीसी) यांना गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले. तसेच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तांना अ‍ॅप बंद करण्याबाबत पत्र पाठवले आहे.कार्यालयातील वायुवेग पथकाच्या कारवाईत रॅपिडो अ‍ॅपवर आधारित पाच दुचाकी वाहनांवर एकूण ५६,००० रुपये दंड आकारण्यात आला आहे.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील कोणीही रॅपिडो बाईक टॅक्सी अ‍ॅप वापरू नये. दुचाकी वाहन मालकांनी आपली वाहने या अ‍ॅपवर ऑनबोर्ड करू नयेत. तपासणीदरम्यान असे वाहन आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.या कार्यालयाकडून सर्व वर्तमानपत्रांना या वृत्ताला विनामूल्य व्यापक प्रसिद्धी देण्याची विनंती करण्यात आली आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून अवैध सेवा टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

No featured image set.

No featured image set.

No featured image set.

No featured image set.

No featured image set.

No featured image set.

No featured image set.