घटस्फोटानंतर उर्मिलाचा मोठा निर्णय, आनंद व्यक्त करत म्हणाली, तुम्हा सर्वांना…

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री उर्मिला कानेटकर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उर्मिलानं आता इन्स्टाग्रामवरील आपल्या नावात बदल केला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिनं ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. अभिनेत्रीच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

उर्मिला कानेटकर ही अभिनेत्री आजवर अनेकदा ‘उर्मिला कोठारे’ या नावाने ओळखली जात होती. मात्र, आदिनाथ कोठारेसोबत विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील नाव बदलण्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता तिच्या इन्स्टाग्राम युजरनेममध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. उर्मिलानं इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला. यासोबत तिनं ‘तुम्हा सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप शुभेच्छा‘ असं लिहिलं. तसेच, इन्स्टाग्रामवरील नाव बदलल्याबद्दल आनंद व्यक्त करत “Thank you Instagram” असंही म्हटलं. दसऱ्याच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमुळे तिच्या नव्या सुरुवातीची चर्चा रंगली आहे.