सरकारकडून मोठं गिफ्ट, कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार, 13,816 रुपये बोनस मिळणार पण कोणाला?
केंद्र सरकारने टपाल विभागाच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता वार्षिक बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाचा फायदा एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ), गट ‘क’ आणि नॉन-गजेटेड गट ‘ब’ कर्मचाऱ्यांना होईल.

केंद्र सरकारने टपाल विभागाच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता वार्षिक बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाचा फायदा एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ), गट ‘क’ आणि नॉन-गजेटेड गट ‘ब’ कर्मचाऱ्यांना होईल. पात्र ग्रामीण डाक सेवकांना देखील एक्स-ग्रेशिया बोनस मिळेल. बोनसची गणना ६० दिवसांच्या पगारावर आधारित असेल, ज्याची कमाल पगार मर्यादा दरमहा ₹७,००० असेल. यानुसार, पात्र नियमित कर्मचारी आणि जीडीएस कर्मचाऱ्यांना अंदाजे ₹१३,८१६ पर्यंतचा कमाल बोनस मिळू शकतो.
टपाल विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशात, बोनसची गणना करण्याचे नियम आणि पद्धत स्पष्ट केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारी वास्तविक रक्कम त्यांची पात्रता, सरासरी पगार आणि कर्तव्याचा कालावधी यावर अवलंबून असेल. टपाल विभागाच्या आदेशानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या बोनस घोषणेमध्ये कर्मचाऱ्यांच्या अनेक श्रेणींचा समावेश आहे.
